आज लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे. राज्यभरातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात लाडक्या गणपती बाप्पाची मोठ्या जल्लोषात प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेली आहेत. भविकांना बाप्पाची प्राणप्रतिष्ठा ही ब्रम्हमुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4 वाजून 50 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 51 मिनिटांपर्यंत करता येणार आहे.
मुंबई पुण्यातील गणेशोत्सव हा विशेष असतो कधी ही न थांबणाऱ्या मुंबईत गणेशोत्सवा दरम्यानचे 10 दिवस फार धामधूमीचे असतात. यादरम्यान चिंचपोकळीच्या चिंतामणीसाठी यंदा जग्गनाथ मंदिराचा सुंदर देखावा साकारण्यात आलेला आहे.
यंदाची चिंतामणीची मुर्ती देखील श्रीकृष्णाच्या रुपात आलेली आहे आणि त्या मुर्तीला साजेसा असा जग्गनाथ मंदिराचा देखावा साकारण्यात आलेला आहे. यावेळी जग्गनाथपुरीचा देखावा साकरल्यामुळे मुंबईकरांना साक्षात श्रीकृष्णाचा जग्गनाथ अवतार पाहायला मिळाला आहे.